धनसंपत्ती वृद्धीसाठी करा हे उपाय

धनसंपत्ती वृद्धीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्यास याचा नक्कीच फायदा होईल.

Updated: Jun 8, 2013, 08:42 AM IST

www.24taas.com
धनसंपत्ती वृद्धीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्यास याचा नक्कीच फायदा होईल.
* मुख्य दारासमोर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळीसाठी एक मातीचे भांडे ठेवायला पाहिजे.
* मुख्य दाराच्या आजूबाजूला चांगल्या फुलांची कुंडी ठेवायला हवी.
* मुख्‍य दारात प्रवेश केल्यावर तेथे एका हँडलमध्ये तीन चिनी नाणे लटकवा. चिनी नाण्यांमध्ये चौकोनी छिद्रे असतात. त्यांना लाल दोर्‍याने बांधा. याच बरोबर मुख्य दाराच्या बाहेरच्या हॅडलवर तीन लहान लहान घंट्या लावायला पाहिजे.
* ओम, त्रिशूळ आणि स्वस्तिकाचे संयुक्त स्टीकर मुख्य दाराच्या समोर दोन्हीकडे लावायला पाहिजे. याला आपल्या बॅग किंवा गाडीवरही लावू शकता. हे लावल्याने घर व गाडी दोघांची सुरक्षा होते. चोरी होण्याची शक्यता कमी होते.
* घरात रोज पाण्यात तुरटी टाकून फरशी पुसायला पाहिजे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर दिवसभर राहतो.
* कासव उत्तर दिशेचे प्रतिनिधित्व करतो. घराच्या उत्तर दिशेला धातूच्या एका प्लेटमध्ये पाणी भरून त्यात एक कासव ठेवावे आणि त्याचे तोंड उत्तरेकडे ठेवावे.
* घरात गणपतीचे चित्र उत्तर किंवा पूर्व दिशाकडे तोंड असलेले लावायला पाहिजे.
* जेवणाच्या खोलीत उत्तरेकडे आरसा लावल्याने अन्नाची टंचाई जाणवत नाही.
* शयनगृहात गुलाबी, हलका निळा किंवा हलका हिरवा रंग हवा. तो शांतीचे प्रतीक आहे. हलक्या निळ्या रंगाने आत्मविश्वास वाढतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.