www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हिंदू धर्म शास्त्रात स्नानाशिवाय भोजन करणे वर्ज्य आहे. शास्त्रानुसार स्नानाशिवाय केलेलं भोजन हे मल खाण्यासारखेच आहे. सध्या या बाबींकडे फार गंभीरतेने पाहीलं जात नाही. यामागे फक्त धार्मिक कारणच नसून वैज्ञानिक कारणही आहे.
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार स्नानामुळे शरीरावरील सर्व धूळ साफ होऊन नवीन उत्साह संचारतो. ज्यायोगे स्वाभाविकपणे भूक लागते. अंघोळीनतंर केलेल्या जेवणातून शरीराला पोषक द्रव्यं मिळतात. जर अंघोळीपूर्वी जेवण केलं, तर जठराग्नि ते पचवण्यचे कार्य सुरू करते. यावेळी अंघोळ केल्याने शरीर थंड होऊन पोटाची पचन शक्ति कमी होते. तसेच आतडेही कमजोर होतात.
ज्या व्यक्ती अंघोळीपूर्वी जेवण करतात त्यांना मलावरोधाची व्याधी जडण्याची शक्यता असते. यासोबतच पोटाचे इतर आजार होऊ शकतात. म्हणूनच स्नानाशिवाय भोजन करणे वर्ज्य आहे. आवश्यकताच असेल तर ऊसाचा रस, पाणी, दूध, फळे व औषधं स्नानाआधी घेण्यास हरकत नाही. कारण पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना पचण्यास जास्त वेळ लागत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.