मुंबई : अनेकांची देवावर श्रद्धा असते. त्यामुळे ते मंदिरात जाणे पसंत करतात. मात्र, प्रत्येक वेळी मंदिरात जाणे होत नाही. त्यामुळे अनेकांच्या घरात मंदिर किंवा देव्हारा असतो. पूजा-पाठ केल्याने मनाला शांती मिळते. सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी अनेक जण घरात मंदिर ठेवतात.
तुम्ही चांगल्या फळाची अपेक्षा ठेवत असाल तर काही गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. देवाची कृपा राहावी यासाठी घरात काही नियम आणि गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
१. वास्तूनुसार देव्हारा किंवा पूजा घर उत्तर दिशेकडे असायला हवे.
२. मंदिर/देव्हारा पश्चिम-दक्षिण दिशेकडे असणे अशुभ मानले जाते.
३. देव्हारा हा वरती असून नये. तसेच आजुबाजुला शौचालय असू नये.
४. देव्हारा स्वयंपाक खोलीत नसावा. ते चांगले नसते.
५. मंदिरात दोन देवाचे दोन फोटो असतील तर ते समोरा समोर नकोत.
६. देवाच्या मूर्ती असतील तर एकमेकांपासून १ इंच मध्ये अंतर असावे.
७. एकाच घरात अनेक मंदिर किंवा देव्हारे नकोत. यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तसेच आर्थिक स्थिती चांगली राहत नाही.
८. सीडी किंवा तळघारात मंदिर असू नये. त्यामुळे पूजापाठ केल्याचा लाभ होत नाही.
९. ज्या बाजुला मंदिर किंवा देव्हारा असेल त्या दिशेने झोपताना पाय करुन झोपने चांगले नाही.