मुंबई : 5 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बुद्धि, ज्ञानाची देवता म्हणजे गणपती बाप्पा. रविवारी सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी चतुर्थी सुरु होत असून 5 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी संपेल.
मुहूर्तानुसार सोमवारी सकाळपासून रात्री 9 वाजून 10 मिनिटांपर्यंत बाप्पाची पूजा आणि स्थापना केली जाऊ शकते. पूजासाठी सगळ्यात चांगला मुहूर्त सोमवारी 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजून 38 मिनिटांपर्यंत आहे. सूर्योदयाआधी उठून स्नान आणि नित्यकर्म उरकून संपूर्ण घर गंगाजलाने शुद्ध करा.
गणपती बाप्पाची धूप, दूर्वा, दीप, पुष्प, नैवेद्य आणि जल यांनी पूजा करा. भगवान गणेशाला लाल वस्त्र धारण केली पाहिजेत. वर्षभरातील चतुर्थींपैकी ही चतुर्थी सगळ्यात मोठी चतुर्थी मानली जाते.
वर्षभरात अनेक चतुर्थी येत असतात. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केल्याने घरात संपन्नता, समृद्धि, सौभाग्य आणि धनधान्याची वृद्धी होत असते.