www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्याकडे वारांना फार महत्त्व असतं नाही का? सोमवारी, गुरुवार हे तर हमखास उपवासाचे वार... पण, इतरही वारांनाही तेवढंच महत्त्वं असतं बरं का… आणि शास्त्रात या दिवशी कोणते पदार्थ उपयोगी ठरतात हेही सांगितलं गेलंय.
रविवार : रविवार हा सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस मानला गेला आहे. सूर्यदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक रविवारी गूळ आणि तांदूळ, तांब्याचे नाणे नदीमध्ये प्रवाहित करा. सूर्याला अर्घ्य द्या.
सोमवार : शास्त्रानुसार सोमवार हा चंद्राचा दिवस आहे. चंद्रदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी खीर अवश्य खावी. कुंडलीत चंद्र नीचेचा असेल तर पांढर्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत आणि चंदनाचा टिळा लावावा.
मंगळावर : मंगळ ग्रहाच्या विशेष पूजेचा हा दिवस आहे. या दिवशी मसुराची डाळ दान करावी. ज्या लोकांना मंगळ आहे त्यांनी लाल वस्तूंचे दान करावे. प्रत्येक मंगळवारी थोड्या रेवड्या नदीमध्ये माशांसाठी टाकाव्यात. हनुमानाची पूजा करावी.
बुधवार : बुद्धीचे देवता बुध ग्रहाचा हा दिवस आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध अशुभ असेल त्यांनी या दिवशी मुग खाऊ नयेत तसेच दान करू नयेत.मंगळवारी रात्री हिरवे मुग भिजवून ठेवावेत आणि बुधवारी सकाळी हे मुग गाईला खाऊ घालावेत.
गुरुवार : हा देवगुरु बृहस्पतीचा दिवस आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु चांगल्या स्थितीमध्ये नसेल त्यांनी ब्राह्मणाला पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करावेत. कढी-भात स्वतःही खावा आणि गरीब मुलांना खाऊ घालावा. पिवळा रुमाल जवळ ठेवावा.
शुक्रवार : दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांचा हा दिवस आहे. या दिवशी शुक्र ग्रहाची विशेष उपासना करावी. या दिवशी दही आणि लाल ज्वारी दान करावी. पांढरे रेशमी वस्त्र दान करावे.
शनिवार : शनिवारी शनिदेवाची विशेष पूजा करावी. या दिवशी एखादे नवीन काम सुरु करू नये.प्रत्येक शनिवारी एक नारळ नदीमध्ये प्रवाहित करावे. शनिदेवाचे दर्शन घ्यावे आणि तेल अर्पण करावे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.