www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या अनेक गोष्टी मग त्या सुखाच्या असो किंवा दु:खाच्या आपल्याला त्या कुणाशी तरी शेअर करायच्या असतात. आजकाल तर फेसबूक, ट्विटर सारख्या गोष्टींमुळे लोक अगदी साध्या साध्या बाष्कळ गोष्टीही सार्वजनिक करण्यास कचरत नाहीत. पण, आपल्या जीवनातल्या काही गोष्टी अशा असतात ज्या उघड न करण्यातच शहाणपणा असतो.
अनेक गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतात. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणणं आपल्यासाठी अशक्य नसतं. काही वेळा आपल्या हातून चुका घडून गेलेल्या असतात. भविष्यात त्या चुकांची आपल्याला किंमत मोजावी लागू शकते. अशा वेळी आपण कोणत्या गोष्टी इतरांना सांगाव्यात आणि कोणत्या नाहीत, याबद्दल काही गुजगोष्टी...
> आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.
> शहाणा मनुष्य सदैव आपल्या कमतरता आणि गुप्त गोष्टी गुप्तच ठेवत असतो. जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात, ते भविष्यात कधी ना कधी अडचणीत येतात. आपण कधीही आपल्या आर्थिक स्थितीविषयी खरी माहिती इतरांना सांगू नये.
> आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे दु:ख होते, मनातील दु:ख किंवा संतापही गुप्त ठेवले पाहिजे. जवळपास प्रत्येक विवाहित माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतातच. त्यामुळे नवरा-बायकोतील या गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नये.
> कधी-कधी नीच व्यक्ती किंवा संस्कारहीन व्यक्तीशी वाद-विवाद होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्या लोकांच्या शब्दांत काहीही गांभीर्य नसते. त्यामुळे त्या लोकांच्या तोंडून आलेली माहितीही कोणासमोर सांगू नये. तुम्हालाही अपमान सोसावे लागले असेल तरीही त्याविषयी इतरांसमोर काहीही बोलू नका
> या साऱ्या गोष्टी इतरांसमोर सांगितल्याने लाभ तर काहीच नाही, पण भविष्यात मोठं संकट येऊ शकतं. त्यामुळे या गोष्टी गुप्तच ठेवणे चांगलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.