मुंबई : मांसाहार केल्यावर देवाचं नामस्मरण करावं का? मांसाहार केल्यावर देवाचं नाव घेतल तर पाप लागेल ही शंका भीती अनेकांच्या मनात असते.
हिंदू धर्मियात बहुतांश देव हे क्षत्रिय मानले जातात बहुतांश लोक हे मांसाहार करणारे असल्यानं त्यांच्या मनात भीती असते पण ही भीती निराधार आहे.
मासं भक्षण केलं तरीही आपण आपल्या इष्ट देवतेचे नामस्मरण करू शकतो. पण त्यात एकाग्रता येण्यात अडथळे येवू शकतात मांसाहार पचायला जड असल्यानं शरीराला जास्त ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. त्यामुळे नामस्मरण किंवा साधनेतली एकाग्रता साधता येत नसल्यानं तपस्वी किंवा पौरौहित्य करणारे मांसाहार टाळतात.
मात्र सर्वसामान्य माणसानं मांसाहार केला तरी नामस्मरण करणे टाळू नये. आपण काय खातो यापेक्षा देवाची पूजा करतांना शारीरिक स्वच्छता आणि नामस्मरण करतांना मनाची एकाग्रता महत्वाची त्यामुळे आहार कुठलाही घेतला तरी देवाच नाव घेतांना चांगल काम करतांना देव कधीच नाराज होत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.