नवी दिल्ली : सर्व धर्मांच्या वेगवेगळ्या प्रथा, रितीरिवाज असतात. हिंदू धर्मातही लग्न, जन्म, मृत्यू, नामकरण सोहळ्यादरम्यान अनेक परपंरा आहेत. हिंदू धर्मात मुंडन करण्याचीही परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. तिरुपती आणि वाराणसी या धार्मिक स्थळांच्या ठिकाणीही मुंडन करणे शुभ मानले जाते.
केस अहंकाराचे प्रतीक मानले जातात. हिंदू धर्मात जन्मानंतर लहान मुलांचे मुंडन केले जाते. मुंडन केल्याने आपल्यातील अहंकाराचा त्याग करुन स्वत:ला देवाला समर्पित केले जाते. मुंडन केल्याने वाईट विचार नष्ट होतात असेही मानतात.
जेव्हा एखादी इच्छा पूर्ण होते तेव्हा काहीजण मुंडन करतात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर लोक त्यांचे केस देवाला अर्पण करतात. ही परंपरा तिरुपती आणि वाराणसी येथे सुरु आहे. मृत्यूनंतर जेव्हा पार्थिवाचे अंत्यसंस्कार केले जाते त्यानंतर मुंडन करतात. यापाठीही कारण आहे.
जेव्हा देहाला अग्नी दिला जातो. त्यावेळी काही हानीकारक जिवाणू आपल्या शरीरावर चिकटतात. यासाठीच शरीराची स्वच्छता अधिक चांगल्या पद्धतीने कऱण्यासाठी मुंडन केले जाते. तसेच नदीत स्नान करण्याचे तसेच उन्हात बसण्याचीही परंपरा आहे.