दादा तुम्ही 'अजित' होता...'अजित'च राहणार.....!

 पिंपरी चिंचवड नगरीच्या अजित राजांचा पराभव केल्यानंतर त्यांच्या संन्यास सोहळ्याचे साक्षीदार झालेला योद्धा महेश आणि लक्ष्मण यांचा सारथी सारंग त्याच्या वाड्यावर परत आला. योध्ये लक्ष्मण आणि महेश ही त्यांच्या महलावर परत गेले होते....

Updated: Dec 12, 2016, 07:01 PM IST
दादा तुम्ही 'अजित' होता...'अजित'च राहणार.....! title=

...आणि दादांनी संन्यास घेतला- भाग 2)

(प्राप्त परिस्थितीत काही राजकीय पंडितांनी वर्तवलेल्या भाकितांवर आधारित आणि दादांनी संन्यास घेतला हा काल्पनिक सोहळा आपण अनुभवला...! पण राजकीय स्तिथी कायम नसते, त्याच मुळे या काल्पनिक सोहळ्याचा हा भाग दुसरा...खास आपल्यासाठी...!)

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड नगरीच्या अजित राजांचा पराभव केल्यानंतर त्यांच्या संन्यास सोहळ्याचे साक्षीदार झालेला योद्धा महेश आणि लक्ष्मण यांचा सारथी सारंग त्याच्या वाड्यावर परत आला. योध्ये लक्ष्मण आणि महेश ही त्यांच्या महलावर परत गेले होते....

संन्यास सोहळ्यानंतर कमळाच्या विजयाचा उन्माद सर्वत्र दिसत होता. गुलाल,फुलांची उधळण सर्वत्र होत होती, त्याच उन्मदात सारथी सारंग निद्राधीन झाला. सकाळी कसल्या तरी आवाजाने तो उठला. नेहमी कानावर पडणारे संगीत त्याला ऐकू येत नव्हते, कमळाचा विजयोत्सव सलग आठ दिवस साजरा करायचा हे फर्मान असताना तो सकाळीच संपला कसा हे त्याला कळेना.

तेवढ्यात वाड्याच्या बाहेर कालच संन्यास घेतलेल्या राजा अजित यांची विजयी मुद्रा असलेली भव्य प्रतिमा त्याला दिसली. काय घडले आहे या विचारतच तो बाहेर पडत असताना विजयाच्या 'सीमा' ज्या 'आशे'वर होत्या त्या दोघी त्याला दिसल्या, तो काय बोलणार एवढ्यात त्यांनीच त्याला विचारले, सारथी असे कसे झाले, आता मात्र सारथी सुन्न झाला, राजे अजित यांचा संन्यास सोहळा स्वप्नात पहिला प्रत्यक्षात राजे 'अजित' होते आहेत आणि राहणार हे अजित यांच्या विजयी मुद्रेतल्या भव्य प्रतिमेच्या दर्शनाने आणि परिसरात विखुरलेल्या घड्याळांनी त्याला कळून चुकले..!

..…..हे झाले कसे हा विचार सारथी सारंगला स्वस्थ बसू देईना...डोक्याला थोडा ताण दिल्यावर त्याला सगळे स्मरु लागले, आपण योध्ये लक्ष्मण आणि महेश यांचे सारथ्य पत्करले...ल्यापटॉप रुपी यंत्रातून प्रचंड आकडेवाडी बाहेर काढली..ही पिंपरी चिंचवड नगरी कशी कमळाचीच आहे हे योध्या लक्ष्मण यांना कसं पटवून दिले. मग काय त्यांनी ही आपल्या प्रत्येक डावपेचाला होकार दिला...मग माशी शिंकली कुठे, कमळ शहरात कोमेजून का गेले हे त्याला कळेना..थोडा आणखी ताण दिल्यावर सारथी सारंगला आठवू लागले...

योध्या लक्ष्मण आणि महेश या दोघांचे सारथ्य आपण पत्करले पण आपली निष्ठा योध्या लक्ष्मण यांच्याकडे अधिक झुकलेली होती, त्यामुळे महेश योद्धा नाराज झाला होता..त्यातच एकनाथ रुपी जुन्या कमळ वाल्याच्या रूपाने आपण त्याला शह देण्याचा प्रयत्न केला होता....एकनाथ आणि काही मोजके मूळचे कमळाचे सेनापती वगळता आपण जुन्या कमळवाल्याना किंमत ही दिली नव्हती. त्यामुळे ज्यांना काम दाखवायचे होते त्यांनी बरोबर काम दाखवले होते हे त्याच्या लक्षात आले. 

घड्याळाचे धाबे दणाणले हे आभासी चित्र निर्माण करण्यासाठी आपण एकाच ठिकाणी चार चार सेनापतींना युद्धात उतरवण्याचे आश्वासन दिले होते आणि प्रत्यक्षात अनेकांना आपण युद्धात उतरवलेच नाही आणि त्यांनी ही आपल्याला काम दाखवले हे त्याच्या लक्षात आले...तिकडे राष्ट्रवादीच्या शिलेदारांना आपण नको तेवढे डिवचल्याने आणि भ्रष्टाचाराचे आभासी चित्र निर्माण करत सर्वांनाच चोर केल्याने राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी एकत्र येत असा पलटवार केला त्याची आपण कल्पना ही केली नव्हती हे सारथी सारंगला उमगले...! 

राजा अजित यांनीच मोठ्या केलेल्या योद्धा महेश आणि लक्ष्मण यांनी राजलाच जायबंदी करायचे ठरवल्या मुळे राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी सर्व शक्ती निशी पलटवार केल्याने आपले सदरेवरचे डावपेच सदरेवर राहिले आणि प्रत्यक्षात रणांगणावर युद्ध खेळण्यात माहिर असलेल्या घड्याळाच्या सेनापतींना विजय मिळाला हे सारथी सारंग समजू लागला..!

तिकडे आपल्या आपल्या महालात योद्धा लक्ष्मण आणि महेश ही उदास मुद्रेने बसले होते..दृष्टिपथात वाटणारा विजय हा फाजील आत्मविश्वासावर होता का असा प्रश्न त्यांना पडला होता.या पराभव पश्च्यात विचारात दोघांनाही राजे अजित यांच्या सहवासात घालवलेले दिवस आठवले. 

कमळ प्रदेशात खरंच सुरुवाती पासून मन रमत नव्हते, पण मान्य कसे करायचे हा अहंम होता हे त्यांना आठवले. एवढ्यात लोकसभा रुपी निवडणुकीच्या रूपाने परत घड्याळ प्रदेशात जायचे का हा प्रश्न त्यांच्या मनाला शिऊन गेला...! 

आपल्या योध्याच्या मनात हा विचार येतोय हे पाहून सारथी सारंग डोक्याला हात लाऊन खाली बसला आणि जगदंब जगदंब म्हणत असताना पिंपरी चिंचवड नगरी अजित होती आणि अजितच राहणार हे त्याला पटलं..तिकडे एक कमळ घड्याळाच्या प्रदेशात कोमेजून पडले होते....दादांची अजित मुद्रा आणि कोमेजलेले ते कमळ सारथी पाहत असतानाच नगरीच्या राजकारणाचे दुसरे वर्तुळ पूर्ण झाले....!