‘आय, मी और मैं’... एक रोमांटिक कॉमेडी

स्वत:च्याच विश्वात रममाण राहणाऱ्या व्यक्तीबरोबर नेमकं कसं वागायचं? याचा विचार कधी ना कधी तुम्हीही केला असेल ना? आय, मी और मैं’मध्ये अशाच एका व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो जॉन अब्राहम. बेजबाबदार, आपल्या आई, बहिण आणि मैत्रिणीच्या जीवावर सफलता प्राप्त करणारा असा हा मुलगा `आई मी और मैं`मधलं मुख्य पात्र आहे. त्याचीच ही कहाणी एक रोमांटिक कॉमेडी आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 3, 2013, 08:30 PM IST

सिनेमा : आय, मी और मैं
कलाकार : जॉन अब्राहम, चित्रांगदा सेन, प्राची देसाई, रायमा सेन
www.24taas.com, मुंबई

स्वत:च्याच विश्वात रममाण राहणाऱ्या व्यक्तीबरोबर नेमकं कसं वागायचं? याचा विचार कधी ना कधी तुम्हीही केला असेल ना? आय, मी और मैं’मध्ये अशाच एका व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो जॉन अब्राहम. बेजबाबदार, आपल्या आई, बहिण आणि मैत्रिणीच्या जीवावर सफलता प्राप्त करणारा असा हा मुलगा `आई मी और मैं`मधलं मुख्य पात्र आहे. त्याचीच ही कहाणी एक रोमांटिक कॉमेडी आहे.
या सिनेमात जॉननं एका आत्मकेंद्री मुलाची भूमिका निभावलीय जो आपल्या जीवनात सफलतेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. ‘आई, मी और मै’ एका अशा कार्पोरेट वातावरणाची कथा आहे जिथं महिलांनाही पुरुषांप्रमाणेच सफल होण्याची पूरेपूर इच्छा आणि मार्ग आहेत. मग, त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असायला हवं. त्यामुळेच अनुष्का (चित्रांगदा) जेव्हा इशानला फक्त घरातूनच नाही तर तिच्या जीवनातूनही हाकलते, तेव्हा कुणालाच जास्त आश्चर्य वाटत नाही. एका नव्या घरामध्ये निघून गेलेला ईशानही जराही वेळ न दवडता शेजारीच राहणाऱ्या गौरीवर (प्राची देसाई) लाईन मारायला सुरुवात करतो.

या सर्वांसोबतच आणखी एक भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे ईशानची स्टाईलिश बॉस बीना. ही भूमिका निभावलीय रायमा सेन हिनं. पूर्ण व्यावसाय स्वत:च्या ताब्यात घेऊन ईशानला रस्त्यावर आणणारी बीना...
अक्कलशून्य आणि चरित्रहिन व्यक्तिची भूमिका जॉननं कोणतेही आढेवेढे न घेता उत्तमरित्या निभावलीय. सिनेमातील गाणी कुठेही सुरू होतात, ते थोडं खटकतं. वास्तवात ‘आय, मी और मै’ एक उत्तम रोमांटिक कॉमेडी आहे, जी एका मतलबी मुलावर आणि त्याच्या जीवनात येणाऱ्या दोन सुंदर स्त्रियांवर बेतलीय. जी प्रत्येक पुरुषाने एकदा तरी पाहावीच...