www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आहिराणी चित्रपट `तुह्या धर्म कोंचा` ला सामाजिक समस्यांवर आधारित सिनेमांमध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
बोली भाषांमुळे भाषा समृद्ध होते असं म्हणतात, मराठीची बोली भाषा असलेल्या आहिराणी भाषेसाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.
सतिष मन्वर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जंगलात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांची समाज व्यवस्थेकडून होणारी अवहेलना मांडण्यात आली आहे.
चित्रपटात उपेंद्र लिमये आणि विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जगतांना आडवा येणारा धर्म तुम्हाला वेगळा विचार करायला लावतो.
आपला धर्म आपली भावना आहे, गरज आहे, की आपली पिळवणूक असे अनेक प्रश्न तुमच्या समोर उभे राहणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.