www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सिनेमांच शुटिंग, मालिकांचं शुटिंग ही कलाकारमंडळी रात्री उशीरापर्यंत करत असतात.. मात्र, पॅकअप झाल्यानंतर आपल्या घरी परतण्यासाठी या कलाकारांना, कर्मचा-यांना काहीच पर्याय उपलब्ध नसतो.. आणि म्हणूनच कलाकारांच्या मागणीनुसार मढ आणि फिल्मसिटी इथून रात्री उशीरापर्यंत बससेवा सुरु करण्यात आलीय..
फिल्मसिटीच्या कर्मचा-यांसाठी रात्री उशिरापर्यंत बेस्ट बसेस सुरु राहणार आहेत. मालाड स्टेशन ते मढ जेट्टीपर्यंत ही बस सेवा असणार आहे. अभिनेता अभिषेक बच्चन याच्या हस्ते या त्याचं नुकतच उद्घाटन झालंय.
बस नसल्यामुळे फिल्मसिटीतून मध्यरात्री घरी परतणा-या कर्मचा-यांची गैरसोय होत होती. त्यामुळे कलावंतांच्या मागणीनुसार बेस्टनं ही सेवा सुरु केली आहे. विविध उपक्रमातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणा-या कलाकारांचा उपक्रम नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.