‘राधा-घना’ची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर!

‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेनंतर आता राधा आणि घनाची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे `मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 25, 2013, 04:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेनंतर आता राधा आणि घनाची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे `मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
`मंगलाष्टक वन्स मोअर` या चित्रपटातून मुक्ता-स्वप्नीलची `केमिस्ट्री` पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री रेणू देसाई पहिल्यांदाच हा मराठी सिनेमा बनवणार आहे. रेणू देसाई मुळच्या पुण्याच्या आहेत. तर समीर जोशी यांनी या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलंय.
मुक्ता आणि स्वप्नील व्यतिरिक्त अभिनेत्री सई ताम्हणकर, कादंबरी कदम आणि हेमंत ढोमे यांच्याही `मंगलाष्टक वन्स मोअर` चित्रपटात भूमिका असणार आहेत. चित्रपटाला नीलेश मोहरीर यांचे संगीत असून गुरू ठाकूर यांची गाणी आहेत. तर या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे `दुनियादारी` या सुपर-डूपर हिट चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर संजय जाधव पुन्हा एकदा छायालेखनाकडे वळलाय.
एकूणच काय तर रूपेरी पडद्यावर `केमिस्ट्री जुळण्या`साठी प्रसिद्ध असलेली स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही सुपरहीट जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. (वृत्तसंस्था)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.