अक्षय-ट्विंकलने दिले मुलीला 'काकां'चे आडनाव

अभिनेता अक्षय आणि ट्विंकलच्या नवजात कन्येचं ‘नितारा खन्ना भाटीया’ असं नामकरण करण्यात आलं आहे. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना श्रद्धांजली म्हणून अक्कीने आपल्या कन्येच नाव नितारा खन्ना भाटीया असं केल आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 2, 2012, 03:22 PM IST

www.24taas.com, मुंबई
अभिनेता अक्षय आणि ट्विंकलच्या नवजात कन्येचं ‘नितारा खन्ना भाटीया’ असं नामकरण करण्यात आलं आहे. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना श्रद्धांजली म्हणून अक्कीने आपल्या कन्येच्या नावात 'खन्ना' नावाचाही समावेश केलाय.
ट्विंकल खन्नाने मागील आठवड्यात गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. यानंतर अक्षयने सांगितले मी खूप आनंदी आहे. आम्हाला मुलगी झाली. ती हुबेहूब तिच्या आई आणि आजीसारखी दिसते. मी सगळ्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छाबद्दल आभारी आहे.
अक्षय आणि ट्विंकलच्या नितारा या कन्येच्याआधी १० वर्षांचा मुलगा आरव आहे. कन्या रत्नाच्या आगमनानंतर अक्षयचे कुटुंब आता खूप आनंदी आहे.