`अमिताभ आणि रेखा एकत्र येणार नाहीत`

गेले कित्येक दिवस अमिताभ आणि रेखा अनीस बाझमीच्या सिनेमात एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र हे दोघेही स्टार्स स्क्रीनवर एकत्र येणार नाहीत, असं ‘डीएनए’कडे स्पष्ट करण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 10, 2013, 01:06 PM IST

www.24taas.com, डीएनए, मुंबई
गेले कित्येक दिवस अमिताभ आणि रेखा अनीस बाझमीच्या सिनेमात एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र हे दोघेही स्टार्स स्क्रीनवर एकत्र येणार नाहीत, असं ‘डीएनए’कडे स्पष्ट करण्यात आलंय.
अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे तर बिग बी अमिताभ बच्चन यांचा उद्या वाढदिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून अमिताभ आणि रेखा अनीस बाझमीच्या वेलकम बॅक या सिनेमात एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, यात काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालंय. अमिताभ आणि रेखा स्क्रीनवर एकत्र येणार नाहीत. अमिताभ यांच्या निकटवर्तियाने स्पष्ट केल्याप्रमाणे अमिताभ बच्चन ती फिल्म करणार नाहीत तसंच त्या सिनेमात असलेले इतर कलाकार कोण आहेत? याचीही कल्पना बीग बीला नव्हती आणि नाही...
अमिताभ बच्चन यांचं नाव ‘वेलकम बॅक’ या सिनेमातल्या ज्या रोलसाठी घेतलं जात होतं त्याच भूमिकेकरता आता सनी देओलला साईन केल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, चेन्नईत इंडियन सिनेमाच्या शताब्दी वर्षानिमित्त एका विशेष कार्यक्रमासाठी जात असताना रेखा आणि अमिताभ दोन्ही ग्रेट कलाकार एकाच विमानात होते, हे याआधी एका फोटोग्राफवरून स्पष्ट दिसलं. त्यामुळे तर दोघं एकाच सिनेमात काम करणार, या अफवांना आणखीनच खतपाणी मिळालं होतं. ‘हा फोटो खरा असला तरी एकत्र चित्रपट मात्र अफवाच’ असल्याचं अमिताभच्या निकटवर्तियाने स्पष्ट केलंय. विमानात इतर कोण कोण प्रवासी होते? याची माहिती अमिताभना नव्हती असं अमिताभ यांच्या निकटवर्तीयानं स्पष्ट केलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.