बोल्ड सिनेमांचा सिलसिला आता टीव्हीवर?

प्रौढांसाठी दाखवले जाणारे बोल्ड सिनेमे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात. मात्र सेन्सॉर बोर्डाने असे बोल्ड सिनेमे रात्री एका ठराविक वेळेत दाखवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे

Updated: Mar 7, 2014, 02:25 PM IST

www.zee24tass.com, झी मीडीया
प्रौढांसाठी दाखवले जाणारे बोल्ड सिनेमे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात. मात्र सेन्सॉर बोर्डाने असे बोल्ड सिनेमे रात्री एका ठराविक वेळेत दाखवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सेन्सर बोर्डाचा हा प्रस्ताव माहिती-प्रसारण खात्याकडे पाठविण्यात येणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या बैठकीत ए सर्टिफिकेट सिनेमे रात्रीच्यावेळी टीव्हीवर दाखवले जाणार याबाबत चर्चा झाल्याचं समजते.
आता फक्त यू आणि यूए सर्टिफिकेटवालेच सिनेमे टीव्हीवर दाखवले जातात. मात्र ए सर्टिफिकेट सिनेमाला टीव्हीवर
दाखवयाचे झाल्यास, त्याला सेन्सॉरकडून परवानगी घ्यावी लागते. त्यामुळेच बऱ्याचं अॅडल्ट सिनेमांना कात्री लागते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कोणावरही हक्क बजावण्याच्या अधिकार नसतो. मात्र इंडस्ट्रीमध्ये काही सिनेमे जबाबदारीचे उल्लंघन करतात आणि चुकीच्या गोष्टी दाखवला जातात, असे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सांगितले.
सेन्सॉरने सर्टिफिकेट देताना गेल्या वर्षी जी व्यवस्था आणली होती तिचा विचार करावा. तसेच ज्यांना बोल्ड सिनेमे बघायचे नाहीत त्यांनी टीव्ही बंद करावा. ए सर्टिफिकेट सिनेमांसाठी रात्री उशिरा दाखवणे हा चांगला पर्याय आहे, असे काही कलाकारांचे मत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.