`बेशरम`ला बंपर ओपनिंग

रणबीर कपूरच्या ‘बेशरम’ सिनेमाने बॉक्स ऑपिसवर जोरदार कमाई करत सुरूवात केली आहे. समीक्षकांना हा सिनेमा फारसा भावला नसला, तरी प्रेक्षकांनी मात्र सिनेमा पाहायला पहिल्या दिवशी चांगलीच गर्दी केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 3, 2013, 06:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रणबीर कपूरच्या ‘बेशरम’ सिनेमाने बॉक्स ऑपिसवर जोरदार कमाई करत सुरूवात केली आहे. समीक्षकांना हा सिनेमा फारसा भावला नसला, तरी प्रेक्षकांनी मात्र सिनेमा पाहायला पहिल्या दिवशी चांगलीच गर्दी केली आहे.
‘बेशरम’ सिनेमाने पहिल्याच दिवशी २४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. खुद्द रणबीरनेही एवढ्या बंपर ओपनिंगची आशा केली नसेल. हा सिनेमा पहिल्याच आठवड्यात १०० कोटी रुपयांची कमाई करेल, अशी चिन्हं दिसत आहेत. जो सिनेमा पहिल्या दिवशी २० कोटींची कमाई करतो, तो १०० कोटींचा पल्ला गाठतो, असा आत्तापर्यंतचा निष्कर्ष आहे. मात्र बेशरम सिनेमाबद्दल हा निष्कर्ष एवढ्यात काढता येणार नाही.
गांधी जयंतीला राष्ट्रीय सुट्टीचं औचित्य साधत हा सिनेमा प्रदर्शित करण्यात ला. त्यामुळे पहिल्या दिवशी बंपर ओपनिंग मिळणं शक्य झालं. आता येत्या वीकेण्डमध्ये या सिनेमाकडे प्रेक्षक किती उत्साहाने जातात, यावरून केवळ सिनेमाचंच यश जावणार नाही, तर रणबीर कपूरची स्टार पॉवरही समजणार आहे.
सिनेसृष्टीतील खानांना टक्कर देत रणबीर कपूरने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश मिळवला हे. त्याचे बर्फी आणि ये जवानी है दिवानी हे दोन्ही सिनेमे १०० कोटी क्लबमध्ये दाखल झाले आहेत. तिसऱ्या सिनेमानेही १०० कोटी रुपयांची कमाई केल्यास रणबीर कपूरची हॅटट्रिक होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.