www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आलिया भट्टचं ‘जनरल नॉलेज’ किती स्ट्राँग आहे हे तिनं करण जोहरसोबत `कॉफी विथ करन`च्या सेटवर तर दाखवून दिलंच होतं... पण, आता आपला ‘कॉमन सेन्स’ किती स्ट्राँग आहे हे दाखवण्यासाठी तिनं अनुपम खेरच्या ‘कुछ भी हो सकता है’चा सेट गाठलाय.
गंभीर भूमिकाही चांगल्या पद्धतीनं पेलण्यासाठी समीक्षकांनी आलियाची खूप कौतु केलंय... पण, तिच्यातला अल्लडपणा अजूनही कायम आहे. बॉलीवूडच्या ब्यूटी क्वीनचा कॉमन सेन्स किती जागा असतो हे अलिकडेच आलिया भट्टने आपल्या कृतीतून दाखवून दिलंय.
त्याचं झालं असं की, अनुपम खेर यांच्या ‘कुछ भी हो सकता है’च्या सेटवर येण्यासाठी आलियाला आमंत्रण मिळालेलं होतं. अनुपम यांना आलिया लहानपणापासून ओळखते... आणि त्यांना अंकल म्हणून हाक मारते. ‘कुछ भी हो सकता है’मध्ये अनुपम सेलिब्रिटींनी बोलवून त्यांच्या जीवनाबाबत चर्चा करताना दिसतात. याच शो मध्ये आलियानं आपल्या कॉमन सेन्सची झलक दाखवून दिली.
आलियाला आपल्या चप्पल-बुटांवर थोडं अधिकच प्रेम आहे. तिच्याकडे अनेक चप्पल-बुटांचे जोड आहेत. पण, त्यानंतरही तिला आपल्याकडे नव्या अंदाजासाठी आणखी काहीतरी असावं असं सारखं वाटत राहतं... आणि त्यामुळे ती आणखी जोड विकत घेतचं असते.
यावेळी, अनुपम अंकलला भेटाण्यासाठी उत्सुक असणारी आलिया थोडी कन्फ्युझ झाली ती कोणते चप्पल घालून आपण या कार्यक्रमाच्या शूटींगला जावं? या विचारानं... काही केल्या हा पेच तिला सोडवता आला नाही. शेवटी 20 वेगवेगळे चप्पल-बुटांचे जोड घेऊनच आलिया सेटवर दाखल झाली.
हे बघून अनुपमही थोडे चकीत झाले... आणि त्यांनी आलिया बेटीला समजावलं की ‘तू कोणतेही जोड घाल... कारण लोक टीव्हीवर तुझा सुंदर चेहरा पाहणार आहेत... पाय नाहीत’.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.