'डेढ इश्किया'मधील बेगम पारा आणि बब्बन

महिला प्रधान भूमिकेवर चित्रपट चालतात, म्हणून सिनेमातील महिलांची भूमिका ही शोभेसाठी असते, हा समज आता मोडीत निघाला आहे, असं अभिनेत्री माधुरी दीक्षितने म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 2, 2014, 07:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महिला प्रधान भूमिकेवर चित्रपट चालतात, म्हणून सिनेमातील महिलांची भूमिका ही शोभेसाठी असते, हा समज मोडीत निघाला आहे, असं अभिनेत्री माधुरी दीक्षितने म्हटलं आहे.
‘डेढ इश्किया’ चित्रपटाची कथा आणि बेगम पारा नावाचं पात्र आपल्याला ऐकवण्यात आलं तेव्हा आपण प्रचंड प्रभावित झालो, असं माधुरी दीक्षितने म्हटलं आहे.
‘डेढ इश्किया’ चित्रपटातील बेगम पारा ही एक कवयित्री असते, ती विधवा आहे, मात्र तिच्या नवऱ्याची इच्छा आहे की, तिने दुसरं लग्न करावं, तसेच बेगम पाराचा नवरा हा एक कवी असावा.
बेगम पाराने तिच्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वयंमवर रचलं. मात्र दोन वर्ष उलटल्यानंतर, तिसऱ्या वर्षी तिला बब्बन भेटतो, बब्बनची भूमिका अरशद वारसीने साकारली आहे.
पुढे बब्बन आणि बेगम पाराची ही लव्ह स्टोरी कोणत्या वळणार कशी पुढे जाते, हे पाहण्यासाठी आपल्याला १० जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
दहा जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. डेढ इश्किया हा इश्कियाचा पुढील भाग आहे. विद्या बालनच्या इश्कियाच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. महिला केंद्रीत भूमिका असलेले चित्रपटही चालतात, हे यावरून सिद्ध झालं आहे.
माधुरी दीक्षितचा आगामी चित्रपट डेढ इश्किया प्रदर्शनाआधी चर्चेत आहे. हा चित्रपट माधुरीच्या अभिनयाला आणखी आकार देणार आहे.
नेहमीच्या भूमिकेपेक्षा यात माधुरीची भूमिका वेगळी आणि आव्हानात्मक आहे. डेढ इश्किया आणि गुलाब गँग हे आगामी चित्रपट माधुरीसाठी महत्वाचे ठरणारे आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.