आता `ढोबळें`ची व्यक्तीरेखाही वादात...

हातात हॉकी स्टिक घेऊन फेरीवाले आणि अनधिकृत व्यावसायिकांना दणका देणारे मुंबईतील एसीपी वसंत ढोबळे यांच्यावर सिनेमा येतोय. ‘दि सॅटर्डे नाईट’ असं या सिनेमाचं नाव आहे. मात्र, हा सिनेमाही प्रदर्शित होण्याअगोदरच वादात सापडलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 3, 2013, 04:22 PM IST

www.24taas.com, मुंबई
हातात हॉकी स्टिक घेऊन फेरीवाले आणि अनधिकृत व्यावसायिकांना दणका देणारे मुंबईतील एसीपी वसंत ढोबळे यांच्यावर सिनेमा येतोय. ‘दी सॅटर्डे नाईट’ असं या सिनेमाचं नाव आहे. मात्र, हा सिनेमाही प्रदर्शित होण्याअगोदरच वादात सापडलाय.
‘एसीपी ढोबळे हे स्त्रियांना मारहाण करतात, स्वतःच कायदे मोडतात असं या सिनेमात दाखवण्यात आल्यानं’ या सिनेमाला आक्षेप घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा वादात सापडलाय. याबाबत सिनेमाचे प्रोड्युसर आणि प्रॉडक्शन हाऊसला वकिलांनी नोटीस पाठवलीय. मुंबईतील लेट नाईट चालणारे पब बार, हुक्का पार्लर्स, अनधिकृत फेरीवाले यांना दणका देणाऱ्या वसंत ढोबळेंच्या कारवाईने भल्याभल्यांनी चांगलाच धसका घेतला होता.
सध्या मुंबई पोलीस कंट्रोल रुममध्ये तैनात असणाऱ्या ढोबळेंनी समाजसेवा शाखेत काम करताना आपला वचक बसवला होता. मात्र, बॉलिवूडमधील काही मंडळी आणि बड्या सोसाट्यांमधील काहींनी फेसबुकच्या माध्यमातून ढोबळेंविरोधात मोहीम उघडली होती.

दिग्दर्शक जयप्रकाश दिग्दर्शित ‘दी सॅटर्डे नाईट` या चित्रपटात आरिफ झकेरिया मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. सोशल नेटवर्किंगमधून झालेली फसवणूक, ड्रग्ज, दारूच्या आहारी गेलेल्या तरुणीभोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. मिशका मिलेनियम मूव्हिज आणि पाटला प्रॉडक्शानची निर्मिती असलेल्या या चित्रपटात आरिफ झकेरिया, प्रशांत नारायण, अमन वर्मा, माही खांडुरी, गौरव दीक्षित, मुश्तातक खान, बॉबी डार्लिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. गीतरचना संदीप नाथ यांची असून, संगीत अंकित तिवारी यांचे आहे.