पूनम पांडेच्या अभिनयाची दिग्दर्शकावर `नशा`!

ट्विटरवर धुमाकूळ घालणाऱ्या पूनम पांडेचं आता चक्क कौतुकही होऊ लागलं आहे. हे कौतुक तिच्या आगामी `नशा` या सिनेमाच्या दिग्दर्शकाने केलं आहे. दिग्दर्शक अनिल सक्सेना पूनम पांडेच्या अभिनयावर भलताच खूष झाला आहे. तो सध्या जिथे तिथे तिची तारीफ करत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 17, 2012, 05:55 PM IST

www.24taas.com,
ट्विटरवर धुमाकूळ घालणाऱ्या पूनम पांडेचं आता चक्क कौतुकही होऊ लागलं आहे. हे कौतुक तिच्या आगामी `नशा` या सिनेमाच्या दिग्दर्शकाने केलं आहे. दिग्दर्शक अनिल सक्सेना पूनम पांडेच्या अभिनयावर भलताच खूष झाला आहे. तो सध्या जिथे तिथे तिची तारीफ करत आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना सक्सेना पूनम पांडेची स्तुती करत होता. यावेळी सक्सेन म्हणाला, की पूनम पांडेकडे जबरदस्त अभिनय क्षमता आहे. तिचा अभिनय अत्यंत सहज आणि नैसर्गिक आहे. ती बोल्ड सीन्स करतानाही अजिबात घाबरत नाही. ती पूर्णपणे दिग्दर्शकाची अभिनेत्री आहे. दिग्दर्शक जसं सांगतो, तसं ती तंतोतंत करते.
एवढंच नव्हे, तर पूनमच्या अभिनयाची तारीफ करताना त्याने तिची तुलना बिपाशा बासूशी केल. अनिल सक्सेना म्हणाला, की पूनम पांडे बिपाशा बासूपेक्षा कितीतरी पटीने टॅलेंटेड आहे. पूनम पांडे बिपाशाहून अधिक प्रतिभावंत आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय संपन्न करणारा होता. बॉलिवूडमध्ये पूनम पांडेचं भविष्य उज्ज्वल आहे.