www.24taas.com झी मीडिया, मुंबई
बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज ७९ वा जन्मदिवस आहे. गुलजार यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... खूप कमी लोकांना त्याचे खरं नाव माहित आहे. त्यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे.
१८ ऑगस्ट १९३४ साली पाकिस्तान येथील झेलम जिल्ह्यातील दिना शहरामध्ये जन्मलेले गुलजार हे गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, संवाद लेखक आहेत. एवढंच नाही तर ते दिग्दर्शक देखील आहेत. गुलजार यांच्या ‘परिचय’, ‘कोशिश’, ‘आंधी’, यां सारख्या अनेक ऐतिहासिक सिनेमांना पुरस्कार मिळाले आहेत.
गुलजार यांनी लिहिलेल्या प्रत्येक गाण्यात एक वेगळेपण आहे. चित्रपटसृष्टीत तर गुलजार हे शब्दाचे राजेच आहेत. त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षणावर, रंगावर गाणी लिहिली आहेत. त्याच्या प्रत्येक गाण्यात उच्च साहित्यिक मूल्यं दिसून येतात.
गुलजार यांना त्याच्या अनेक गाण्यासाठी आणि दिग्दर्शित केलेल्या अनेक सिनेमासाठी पुरस्कार मिळाले आहेत. गुलजार यांना आत्तापर्यत एकूण २० पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
गुलजार उर्दू भाषेवर हुकुमत प्रभुत्व दिले आहे. त्यांसोबत मारवाडी, हरियाणवी या भाषांचासुद्धा आपल्या गाण्यात वापर केला आहे. गुलजार यांना हिंदी सिनेमासाठी पद्म भूषण देऊन सन्मानित केले आहे. २००८ मध्ये आलेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या सिनेमातील ‘जय हो’ या गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला.
आपल्याला हे ऐकून तर आश्चर्य वाटेल, गुलजार हे गीतकार होण्याआधी एक कार मॅकेनिक होते. दिग्दर्शक बिमल रॉय आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत राहून त्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. गुलजार हे सिनेमाच्या दुनियेतील कोहीनूर आहेत. गुलजार यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.