`चेन्नई एक्सप्रेस` सीमेपारही सुसाट!

सुपरस्टार शाहरूख खानची ‘चेन्नई एक्सप्रेस’ ही पाकिस्तानमध्येदेखील सुसाट धावत आहे. या सिनेमाने पाकिस्तीनातील कराचीमध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 18, 2013, 04:26 PM IST

www.24taas.com झी मीडिया, कराची
सुपरस्टार शाहरूख खानची ‘चेन्नई एक्सप्रेस’ ही पाकिस्तानमध्येदेखील सुसाट धावत आहे. या सिनेमाने पाकिस्तीनातील कराचीमध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ईदच्या दिवशी रिलीज झालेल्या या सिनेमाने पाकिस्तानमध्ये नवा रेकॉर्ड तयार केला आहे.
पाकिस्तानमध्ये एवढा हिट ठरलेला चेन्नई एक्सप्रेस हा पहिलाच भारतीय सिनेमा आहे. हा सिनेमा कराचीमध्ये ७ चित्रपटगृहांमध्ये चालू आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने ४ कोटी रुपयांची कमाई केली असल्याचं आयएमजीसी या पाकिस्तानातील सर्वात मोठ्या सिनेमा वितरक कंपनीच्या प्रवक्त्यांनी, मोहम्मद कादरी यांनी सांगितले आहे.
या आधी पाकिस्तानमध्ये सलमान खानचा ‘दबंग’ हा सिनेमा जास्त हिट झाला होता आणि त्यामुळे सर्वात जास्त कमाई झाली होती. पण त्यानंतर आता ‘दबंग’चा रेकॉड तोडत ही जागा शाहरूखच्या चेन्नई एक्सप्रेसने घेतली आहे.
पाकिस्तानमध्ये ‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमाच्या तिकिटांची आधिक मागणी आहे. सध्या रोज पाच ते सहा शो हे फक्त ‘चेन्नई एक्सप्रेस’चेच आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.