मी बोल्ड भूमिका करणार नाही- मल्लिका शेरावत

मल्लिका शेरावत म्हटलं की बोल्ड भूमिका आणि आयटम साँग अस समीकरण आहे. मल्लिकाने तोकडे कपडे घालून बोल्ड सीन्स करणं हे आपल्याला नवीन नाही. पण चक्क मल्लिका शेरावतला आता बोल्ड भूमिका करायच्या नाहीत तसं तिने जाहीर केलयं.

Updated: Apr 23, 2013, 06:44 PM IST

www.24taas.com, मुंबई
मल्लिका शेरावत म्हटलं की बोल्ड भूमिका आणि आयटम साँग अस समीकरण आहे. मल्लिकाने तोकडे कपडे घालून बोल्ड सीन्स करणं हे आपल्याला नवीन नाही. पण चक्क मल्लिका शेरावतला आता बोल्ड भूमिका करायच्या नाहीत तसं तिने जाहीर केलयं.
‘आता मला अशा चित्रपटांमध्ये काम करायचयं ज्यामध्ये मला अभिनय करता येईल. मी ग्लैमरस भूमिका आणि आइटम नंबर करू इच्छित नाही. मी हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे. मला ग्लैमरस भूमिका आणि आइटम नंबरसाठी खूप प्रस्ताव आले आहेत परंतु ते मी स्वीकारणार नाही’, असं मल्लिकाने स्पष्ट केल आहे.

आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करणारी मल्लिका तिच्या आगामी सिनेमात ‘डर्टी पॉलिटिक्स’मध्ये एकदम देसी अवतारात दिसणार आहे. या सिनेमात ती जोधपूरच्या एका देवीची भूमिका निभावली आहे. भंवरी देवीचे राजकारण्यांसमवेत असलेले संबंध आणि त्यानंतर तिची रहस्यमय हत्या करण्यात आली होती. के सी बोकाडिया दिग्दर्शित सिनेमात मल्लिका सोबत ओम पुरी, अनुपम खेर आणि आशुतोष राणा यांनीही आपली अभिनयाची छाप पाडली आहे.