जाता जाता जिया खान काय म्हणाली?

`निःशब्द` या हिंदी सिनेमातून करिअरची सुरूवात करणारी नवोदीत अभिनेत्री जिया खानने सर्वांची मने जिंकली होती. निर्माता, दिग्दर्शक यांनाही स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले होते. तिच्यावर बॉलिवूडही फिदा होते. मात्र, तिचे कोणावरही प्रेम नव्हतं. त्याबाबत तिने तसा खुलासाही केला होता. अक्षय कुमारबरोबर तिचे नाव जोडले गेले होते. त्यावेळी तिने को-स्टार असल्याचे स्पष्ट केलं होतं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 4, 2013, 03:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`निःशब्द` या हिंदी सिनेमातून करिअरची सुरूवात करणारी नवोदीत अभिनेत्री जिया खानने सर्वांची मने जिंकली होती. निर्माता, दिग्दर्शक यांनाही स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले होते. तिच्यावर बॉलिवूडही फिदा होते. मात्र, तिचे कोणावरही प्रेम नव्हतं. त्याबाबत तिने तसा खुलासाही केला होता. अक्षय कुमारबरोबर तिचे नाव जोडले गेले होते. त्यावेळी तिने को-स्टार असल्याचे स्पष्ट केलं होतं.
अक्षय आणि जियाबाबत मीडियात चर्चा सुरू होती. अक्षय बरोबर तिने `हाऊसफुल` हा सिनेमा केला. त्यामुळे त्याचीशी नाव जोडले गेले. अनेकवेळा ती अक्षयसोबत दिसली. त्याबाबत जियानेच स्पष्टकरण दिलं. माझं कोणावर प्रेम नाही. अक्षय हा माझा चांगला मित्र आणि सहकारी आहे. त्यामुळे या चर्चेवर पडदा पडला.

गेल्या काही महिन्यांत अमेरिकत जाण्यापूर्वी जियाने मार्चच्या शेवटी आपली पहिली आणि एकमात्र होळी भारतात साजरी केली होती. मात्र, अमेरिकेत राहत असताना तिने कधीही होळी खेळली नव्हती. होळी खेळण्यासाठी ती खास दिल्लीत दाखल झाली होती, ही माहिती तिने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दिली. ही तिची शेवटची मुलाखात.

मला माझ्या चाहत्यांबरोबर होळी खेळायची आहे, असे या मुलाखतीत स्पष्ट केले. मला रंगाची अॅलर्जी आहे. त्यामुळे मी फुलांची होळी खेळेन. यावेळी तू होळी कशी साजरी करणार, या विचारलेल्या प्रश्नावर ती म्हणाली, मी आतापर्यंत कधीही होळी खेळलेली नाही. पहिल्यांदाच होळी खेळणार आहे. याचवेळी तिने स्पष्ट केले की, मला एकटीला राहणे आवडते. मात्र, माझ्या मनात येते त्यावेळी मी चाहत्यांसोबत राहते.
मार्च महिन्यात होळी खेळण्याआधी चार दिवसांपूर्वी ती एका फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. त्यासाठी ती दिल्लीत आली होती. आज जिया खान आपल्यात नाही, हे ऐकूण बॉलिवूडमध्ये सन्नाटा पसरलाय. तिच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

फोटोफीचर बॉलिवूडमधल्या आत्महत्या...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.