www.24taas.com, मुंबई
अक्षय कुमारच्या ‘खिलाडी 786’ सिनेमाच्या जाहिरातींवर पाकिस्तान सेंसॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. 786 हा मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र अंक असून, या सिनेमामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातील, अशी त्यांना शक्यता वाटत आहे.
पाकिस्तान सेंसॉर बोर्डाने पाकिस्तानातील थिएटर्समध्ये खिलाडी 786च्या जाहिराती न दाखवण्याच्या सूचना दिल्या आहहेत. तसंच या सिनेमाची पोस्टर्सही कुठे दिसू नयेत असं सांगितलं आहे. हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होण्यावरून अजूनही निश्चित सांगण्यात आलेलं नाही.
सात डिसेंबरला रिलीज होणाऱ्या खिलाडी 786 बदल पाकिस्तान सेंसॉर बोर्डाचे अध्याक्ष राजा मुस्तफा हैदर म्हणाले, की आम्ही सिनेमाच्या जाहिरातींवर पाकिस्तानात बंदी आणली आहे. या सिनेमाच्या शीर्षकामुळे मुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. मात्र, फिल्म वितरक सुहेल मुख्तार यांच्या मते जर सिनेमात आक्षेपार्ह संवाद आथवा प्र,ग नसेल, तर सेंसॉर बोर्डाने त्यावर बंदी आणू नये.