संजय दत्तला घरचा डबा बंद!

संजय दत्तला घरचा डबा दिला जाऊ नये, यासाठी येरवडा तुरुंग प्रशासनानं टाडा कोर्टात धाव घेतली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 27, 2013, 05:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
संजय दत्तला घरचा डबा दिला जाऊ नये, यासाठी येरवडा तुरुंग प्रशासनानं टाडा कोर्टात धाव घेतली आहे. तुरुंग प्रशासनाच्या नियमावलीत शिक्षा झालेल्या कैद्याला घरचं जेवण देण्याची परवानगी नाही त्यामुळे संजय दत्तला घरचा डबा दिला जाऊ नये अशी मागणी येरवडा तुरुंग प्रशासनानं केलीय.
संजय दत्तनं घरचं जेवण मिळावं अशी मागणी टाडा कोर्टाकडे केली होती, कोर्टानं ही मागणी मान्य केली होती. मात्र आता येरवडा जेल प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आता संजय दत्तला सरकारी जेवण जेवावं लागण्याची शक्यता आहे.
संजय दत्त सश्रम कारावास भोगत असला तरी सुरक्षेच्या काराणांमुळे त्याला पर्यायाने सोपं काम दिलं गेलं आहे. संजय दत्तला पेपर फाइल्स बनवण्याचं काम देण्यात आलं आहे. संजय दत्तला जीवे मारण्याची धमकी देणारं निनावी पत्र समोर आल्यामुळे संजय दत्तला तुरुंगातही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तुरुंगातील इतर कैद्यांमध्ये तो मिसळू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.