www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेते ओम पुरी यांनी पत्नी नंदिता यांनी केलेले मारहाणीचे आरोप साफ फेटाळून लावलेत. ओम पुरी यांच्या म्हणण्यानुसार ‘जर घरात काठीच नसेल तर मी पत्नीला काठीनं मारहाण करूच कसा शकतो? जर काठीनं मारहाण झाली असेल तर त्या काठीची फॉरेन्सिक टेस्ट व्हायला हवी’.
बुधवारी, पोलिसांनी फरार म्हणून घोषित केलेले ओम पुरी सत्र न्यायालयासमोर हजर झाले होते. सत्र न्यायालयानं त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या अटकेवर ३० ऑगस्टपर्यंत स्थगिती दिलीय.
‘नंदितानं यापूर्वीही माझ्यावर आणि माझ्या पहिल्या पत्नीवर – सीमावर मुलाच्या अपहरणाचा आरोप केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती आपल्या आरोपांवर पलटी खाल्ली... आणि केवळ अशी शक्यता आहे, असं मला म्हणायचं होतं असं म्हटलं... या घटनेवरून तिची मानसिकता लक्षात येऊ शकते’ असं ओम पुरी यांनी म्हटलं.
पत्नीच्या आरोपानंतर ओम पुरी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते नंदिताला योग्य तिच्या आणि मुलाच्या खर्चासाठी भली मोठी रक्कम देतात. पण नंदिता ग्रामीण भागातून आली असली तरी खूप खर्चिक आहे. ‘तिला केवळ आयुष्यभर मिसेस पुरी म्हणून मिरवायचंय त्यामुळेच ती मला घटस्फोटही देत नाही. सोबतच मी तिला सध्या देत असलेले पैसेही तिच्या हातून जाण्याची तिला भीती आहे’ असं त्यांनी म्हटलंय. नंदिताला घटस्फोट दिल्यानंतर आपल्या पहिल्या पत्नीबरोबर (सीमा) बरोबर राहण्याचा विचारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.