यशजींचे अंत्यदर्शन न घेतल्याने आमिर दुःखी

‘किंग ऑफ रोमान्स` यश चोप्रांचे काल लीलावतीमध्ये निधन झाले. रविवारी यश चोप्रांच्या निधनाची बातमी मिळताच शाहरूख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन सर्व यश चोप्रांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले. मात्र, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याला यश चोप्रांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहचता आले नाही.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 22, 2012, 05:19 PM IST

www.24taas.com
‘किंग ऑफ रोमान्स` यश चोप्रांचे काल लीलावतीमध्ये निधन झाले. रविवारी यश चोप्रांच्या निधनाची बातमी मिळताच शाहरूख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन सर्व यश चोप्रांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले. मात्र, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याला यश चोप्रांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहचता आले नाही. सध्या आमिर आपली आई झीनत हुसैन यांना घेऊन हज यात्रेवर गेला आहे.
आमिरने यशजींच्या निधनावर शोक व्यक्त केला असून त्यांच्या अंत्यदर्शनात सहभागी होऊ न शकल्याचे दुःख असल्याचे म्हटले आहे.
अंत्यविधीत आमिर जरी पोहोचू शकणार नसला तरी त्याची पत्नी किरण राव अंत्यविधीवेळी उपस्थित राहुन त्यांना आदरांजली वाहणार आहे.
किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दुपारी तीनच्या सुमारास त्याचं पार्थिव अंधेरीच्या घरातून जुहूच्या स्मशानभूमीत आणण्यात आलं. यावेळे अवघं बॉलिवूडच यशजींच्या अंतिम दर्शनासाठी हजर झालं होतं. तसंच यावेळी त्यांचे शेकडो चाहतेही उपस्थित होते.
शरिरातील प्रमुख अंगांनी काम करणं बंद केल्यानं यश चोप्रा यांचं रविवारी निधन झालं होतं. सोमवारी सकाळी चोप्रा यांचं पार्थिव लोकांना अंतिम दर्शनासाठी यशराज स्टुडिओमध्ये ठेवण्यात आलं होतं. चोप्रा यांचा मुलगा आदित्य आणि उदय तसंच अभिनेत्री रानी मुखर्जी यावेळी स्टेजच्यासमोर नतमस्तक होऊन बसले होते. परिवारातील इतर सदस्य आणि फिल्म जगतातील इतर लोक मात्र मागे बसले होते. स्टुडिओच्या समोरच्या आणि मागच्या दरवाज्यातून अनेक बॉलिवूडकर प्रवेश करतच होते.
तसंच यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शाहरुख खान, विद्या बालन, पंकज कपूर पत्नी सुप्रिया पाठक आणि मुलगा शाहिद कपूरसोबत उपस्थिती होते. ऋषि कपूर, रणबीर कपूर, रणधीपर कपूर, अर्चना पुरन सिंग, परमीत सेठी, पुनीत मल्होत्रा, वरुण धवन, परिणिती चोप्रा, श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत, मनोज कुमार, काजोल आपली आई तनुजा आणि बहीण तनीषासोबत, तब्बू, कबीर खान आपली पत्नी मिनीसोबत, प्रेम चोप्रा, आशुतोष गोवारिकर, विपूल शाह, अब्बास मस्तान, रमेश सिप्पी, गुलजार, सुभाष घई, श्याम बेनेगल, सरोज खान, डेविड धवन, रेसूल पुकुट्टी, इमरान खान तसंच शंकर एहसान लॉय हेदेखील यावेळी उपस्थित होते.
रविवारी यश चोप्रा यांचे लिलावती हॉस्पिटलमध्ये दु:खद निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. डेंग्यूची लागण झाल्यानं त्यांना गेल्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होतं. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. यश चोप्रा यांनी हिंदी चित्रपटांमध्ये ख-या अर्थानं रोमान्स आणला. त्यामुळं बॉलिवूडमध्ये त्यांची किंग ऑफ हार्ट म्हणून ओळख निर्माण झाली.