प्रियांकाच्या `एक्झोटिक`ची रेकॉर्डब्रेक कामगिरी!

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’, अभिनेत्री-गायिका प्रियांका चोप्रा हिचा ‘एक्झॉटिक’ या गाण्यांच्या अल्बमनं सोशल वेबसाईटवर एकच दंगा केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 10, 2014, 01:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’, अभिनेत्री-गायिका प्रियांका चोप्रा हिचा ‘एक्झॉटिक’ या गाण्यांच्या अल्बमनं सोशल वेबसाईटवर एकच दंगा केलाय. गेल्या वर्षीच्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या या अल्बमच्या टायटल साँगनं आत्तापर्यंत यू-ट्यूबवर चार कोटींचा आकडा पार केलाय.
जगप्रसिद्ध रॅपर पीटबूलसोबत प्रियांकाने हे गाणे रेकॉर्ड केले असून, आतापर्यंत त्याला चार कोटी एवढ्या प्रचंड हिट्‌स मिळाल्या आहेत. हा एक नवीन रेकॉर्डच आहे. या गाण्यात देशी तडक्याबरोबर विदेशी संगीतसुध्दा जोडले गेले आहे. आपल्या या यशामुळे प्रियांका कमालीची खूश आहे. ‘चार कोटी हा खूप मोठा आकडा आहे. यावरून लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे हे दिसून येतंय’ असं म्हणत तिनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हे गाणे रिलीज करण्यात आले होते. बॉलिवूडच खास देसी तडका आणि पाश्चाआत्त्य संगीत याचा सुंदर मिलाफ या गाण्यामध्ये पाहायला मिळतो. या अनोख्या विक्रमामुळे ‘देसी गर्ल’ची वर्णी आता डेव्हिड बेकहॅम, केटी पेरी आणि लिआनार्दो डी कॅप्रियो या कलाकारांच्या रांगेत लागली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.