राखी सावंत मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात

बॉलिवूडची हॉटगर्ल राखी सावंत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजतंय. राखी उत्तर पश्चिम मुंबईमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.

Updated: Mar 26, 2014, 04:04 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई,
बॉलिवूडची हॉटगर्ल राखी सावंत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजतंय. राखी उत्तर पश्चिम मुंबईमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.
या मतदारसंघातून मनसेतर्फे महेश मांजरेकर, आपकडून मयांक गांधी, काँग्रेसकडून गुरुदास कामत आणि शिवसेनेकडून गजानन किर्तीकर अशी चौरंगी लढत होत असतानाच, राखीने संकेत दिल्याने हि निवडणूक अजूनच रंगतदार होणार आहे.
मध्यंतरी राखी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांना भेटायला थेट दिल्लीत गेली होती. मात्र तिची काही भेट होऊ शकली नाही. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राखीने भाजप कार्यकत्यांची भेट घेतल्याने ती भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा होती.
मात्र आज राखीला कोणत्या पक्षांचे तिकीट मिळालंय हे अजून स्पष्ट झाले नसून, याबद्दल राखी २९ मार्चला सागंणार आहे. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये चुरशीची लढत बघायला मिळणार आहे. तसेच राखी निवडणूक रिंगणात प्रत्यक्षात उतरली तर किती मतं घेईल याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.