तमन्नानं साजिदला बनवलं ‘दादा’!

‘हिम्मतवाला’ फेम तमन्ना भाटिया आणि सिनेदिग्दर्शक साजिद खान यांच्या अफेअरच्या चर्चा काही दिवसांपासून मीडियात चांगल्याच चघळल्या जात होत्या... पण, या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं तमन्ना म्हणतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 18, 2014, 09:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘हिम्मतवाला’ फेम तमन्ना भाटिया आणि सिनेदिग्दर्शक साजिद खान यांच्या अफेअरच्या चर्चा काही दिवसांपासून मीडियात चांगल्याच चघळल्या जात होत्या... पण, या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं तमन्ना म्हणतेय.
साजिदचा आगामी सिनेमा ‘हमशकल्स’मध्ये काम करणाऱ्या तमन्नानं साजिद मला भावासारखा आहे... आणि आमच्यातल्या अफेअरच्या चर्चा ऐकून थोडं विचित्र वाटतं, असं म्हटलंय.
साजिद खानच्या ‘हिम्मतवाला’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या तमन्नाला आपल्या या अफेअरच्या चर्चा हास्यास्पद वाटतात.
साजिद माझा भाऊ आहे... मी त्याला राखीही बांधते. मला आमच्या दोघांतील अफेअरच्या चर्चा हास्यास्पद वाटतात. जर एक दिग्दर्शक एका कलाकारवर विश्वास ठेवत असेल तर त्यांना एकमेकांबरोबर जोडलं जाणं चुकीचं आहे, हे थोडं विचित्रं वाटतं’ असं तमन्नानं एका मुलाखती दरम्यान म्हटलंय.
तमन्ना ‘हमशकल्स’मध्ये सैफ अली खानसोबत काम करतेय. या सिनेमात हृतेश देशमुख, राम कपूर, बिपाशा बसू आणि ईशा गुप्ता यांच्यादेखील भूमिका आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.