सलमान खानचा लंडन व्हिसा रद्द

बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान याला लंडनचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. साजिद नडियाडवाला याच्या आगमी चित्रपटाच्या शुटिंगसाठी सलमानला लंडनला जायचे होते. परंतु त्याला लंडनचा व्हिसा नाकरण्यात आला असून या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 2, 2013, 09:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान याला लंडनचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. साजिद नडियाडवाला याच्या आगमी चित्रपटाच्या शुटिंगसाठी सलमानला लंडनला जायचे होते. परंतु त्याला लंडनचा व्हिसा नाकरण्यात आला असून या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
या चित्रपटाची शुटिंग सुरू झाली असून सलमानला गेल्या आठवड्यात युनिटला जॉइन करायचे होते. परंतु, व्हिसा रद्द झाला असून तो लंडनला जाऊ शकत नाही.
या संदर्भात काय चुकले हे कोणालाच माहिती नाही. हिट अँड रन केसमुळे त्याला व्हिसा नाकारण्यात आला आणि भारत सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही काही दिवसात ब्रिटनचा व्हिसा मिळविण्याची पद्धत खूप कठीण झाली असून त्यांनी या संदर्भातील कायदे खूप कडक केले आहे.
तुमच्या विरोधात एखादा खटला सुरू असले तर तुम्हांला व्हिसा मिळणे कठीण होऊन बसते.
दरम्यान, सलमान खान याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची सुनावणी १९ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. सलमान खान पुढील आठवड्यात व्हिसासाठी पुन्हा अर्ज करू शकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.