सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला

बॉलीवुडचा दबंग सलमान खानसाठी महत्वाचा आजचा दिवस आहे.२००२ साली झालेल्या हिट एंड रन प्रकरणी सलमानच्या याचिकेवर सेशन कोर्टात सुनावणी होणार आहे. वांद्रे कोर्टाने याप्रकरणी सलमानच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याचा आदेश दिला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 25, 2013, 10:10 AM IST

www.24taas.com,मुंबई
बॉलीवुडचा दबंग सलमान खानसाठी महत्वाचा आजचा दिवस आहे.२००२ साली झालेल्या हिट एंड रन प्रकरणी सलमानच्या याचिकेवर सेशन कोर्टात सुनावणी होणार आहे. वांद्रे कोर्टाने याप्रकरणी सलमानच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याचा आदेश दिला.
वांद्रे कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सलमाननं सेशन कोर्टात अपील केलंय.. सदोष मनुष्यवधाचा खटला चालल्यानंतर सलमान दोषी आढळल्यास त्याला १० वर्षाची शिक्षा होऊ शकते. इतकंच नाहीतर काळवीट शिकार प्रकरणामुळं सलमान कायद्याच्या कचाट्यात अडकलाय.
याप्रकरणी दोषी आढळल्यास त्याला ६ वर्षांची शिक्षा होऊ शकते. याप्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिलला होणार आहे.शनिवारी काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर कोर्टाने सर्व ५ फिल्म स्टार्सविरोधात आरोप निश्चित केले.

हिट एंड रनप्रकरणी सलमान खान सेशन कोर्टात हजेरी लावणार आहे. या खटल्यासाठी हजेरी लावण्यासाठी अमेरिकेत उपचार घेत असलेला सलमान रविवारी पहाटे मुंबईत दाखल झाला. संजय दत्तनंतर आता आहे का सलमानची बारी... दबंगला जावं लागणार का जेलमध्ये. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हटवण्याची सलमानची याचिका. दोषी आढळल्यास १० वर्षांची शिक्षा होईल.
बॉलीवुडचा दबंग सलमान खाननं २००२ साली घडलेल्या हिट एंड रन प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरोधात सेशन कोर्टात अपील केलंय. पोलिसांनी याप्रकरणी सलमानच्या विरोधात बेदरकारपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केला होता. यात दोषी आढळल्यास ३ वर्षांची शिक्षा होते.
सदोष मनुष्यवधाच्या खटल्यात आरोप सिद्ध झाल्यास सलमानला १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.. मुंबई पोलीस सलमान खानला वाचवण्याचा प्रयत्न करत असून खटला लांबवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंह यांनी माहिती अधिकारातून केला.