सलमानच्या ‘जय हो’ला सेन्सॉर बोर्डची कात्री!

सलमानच्या चित्रपटात अॅक्शन असणारच... सलमानचा ‘जय हो’ देखील त्याला अपवाद नाही. त्यातील काही मारधाडीच्या दृष्यांना मात्र सेन्सॉर बोर्डानं (केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र बोर्ड) कात्री लावलीय.

Updated: Jan 20, 2014, 05:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सलमानच्या चित्रपटात अॅक्शन असणारच... सलमानचा ‘जय हो’ देखील त्याला अपवाद नाही. त्यातील काही मारधाडीच्या दृष्यांना मात्र सेन्सॉर बोर्डानं (केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र बोर्ड) कात्री लावलीय.
सलमानलाचा तब्बल एक वर्षानंतर ‘जय हो’ हा चित्रपट येतोय. त्याचे फॅन्सही आवर्जून त्याची वाट पाहतायेत. सलमान चित्रपटाचं जोरदार प्रमोशनही करतोय. मात्र ‘जय हो’ला यू/ए प्रमाणपत्रानं पास करण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा सलमानचा हा पहिलाच चित्रपट आहे.
भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराशी लढणारा नायक या निमित्तानं सलमानच्या चाहत्यांना पाहायला मिळेल. सध्याच्या राजकीय परिस्थितीचे पडसाद या चित्रपटात उमटले आहेत. कुणाचाही अपमान करणारे संवाद चित्रपटात नसल्याचं समजतंय. मात्र यू/ए प्रमाणपत्रानं पास झाल्यामुळं सलमानलाच्या १२ वर्षाखालील चाहत्यांना आपल्या घरातील मोठ्यासोबतच पाहावा लागण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.