करीना-शाहिद पुन्हा एकत्र?

ब्रेक अपनंतर शाहिद कपूर आणि करीना कपूर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. करीना कपूरचा नवाब सैफ अली खानशी विवाहदेखील झाला आहे. मग आता हे एकत्र कसे येतील?

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 18, 2013, 08:30 PM IST

www.24taas.com, मुंबई
ब्रेक अपनंतर शाहिद कपूर आणि करीना कपूर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. करीना कपूरचा नवाब सैफ अली खानशी विवाहदेखील झाला आहे. मग आता हे एकत्र कसे येतील? पण, ते पुन्हा एकत्र येत आहेत, ते खाजगी आयुष्यात नाही तर बॉक्सऑफिसवर...
शाहिदचा ‘फटा पोस्टर निकला हिरो’ हा सिनेमा आणि करीनाचा ‘सत्याग्रह’ सिनेमा एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकदा बॉक्सऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमात अजय देवगण, अमिताभ बचच्चन अशी तगडी स्टारकास्ट आहे. अमिताभ बच्चन या सिनेमात अण्णा हजारेंची भूमिका साकारणार आहे.
तर ‘फटा पोस्टर निकला हिरो’ हा सिनेमा राजकुमार संतोषी यांचा रोमँटिक कॉमेडी असणार आहे. या सिनेमात शाहिद कपूरची जोडी इलियाना डिक्रुजसोबत झळकणार आहे. अर्थात आता या दोन्ही फिल्मसपैकी कोणाचा सिनेमा हिट होतो याचीच चर्चा अधिक रंगेल.