श्रद्धा-आदित्य सिक्रेट हॉलिडेच्या मूडमध्ये...

आशिकी-2 या सिनेमापासून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रोमान्सच्या चर्चा आता जोर धरू लागल्यात.

Updated: Jun 19, 2014, 12:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आशिकी-2 या सिनेमापासून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रोमान्सच्या चर्चा आता जोर धरू लागल्यात.
श्रद्धा आणि आदित्य यांच्या कथित अफेअरची चर्चा दिर्घकाळापासून सुरू आहेत. पण, दोघांनी मात्र सार्वजनिकरित्या कधीही आपल्या नात्याला स्वीकारलेलं नाही. पण, दोघांकडूनही आपलं नातं पुढे जाण्यासाठी कोणतीच कमतरता बाकी राहताना दिसत नाहीय.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आदित्य लवकरच सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी एका सीक्रेट हॉलिडे लोकेशनवर जाणार आहेत. एका इंग्रजी वर्तोमानपत्रानं आपल्या सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिलीय.
श्रद्धा आपला आगामी सिनेमा ‘एक विलन’ प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच आपल्या सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी बाहेर पडणार आहे.
एक विलन 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. आदित्य राय याची वहिनी म्हणजेच विद्या बालन हीदेखील आपल्या दिराच्या पसंतीवर खुश असल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.