www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अमेरिकेत स्थायिक होण्याची बातमी म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं प्रिती झिंटानं ट्विटरवरुन स्पष्ट केलंय. किंग्ज इलेव्हन पंजबामधले समभाग विकणार नसल्याचंही तिनं स्पष्ट केलंय.
मी सर्व लोकांची आभारी आहे. मी मीडियातून आलेल्या बातमीवर हैराण आहे. मी पंजाब टीममधील माझा हिस्सा विकणार नाही आणि मी अमेरिकेत शिप्ट होत नाही. माझ्याबद्दल कोणीही कोणतीही अफवा पसरवू नका.
पाहुया प्रितीनं या संपूर्ण प्रकरणावर काय ट्विट केलंय.
A big Thank U 2all the people 4the support. Amazed at how much speculation in the media. No I'm not selling my stake or settling in the US.
— Preity zinta (@realpreityzinta) June 18, 2014
दरम्यान, बॉलिवूड, अंडरवर्ल्ड आणि उद्योगपतींमधलं कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय. प्रिती झिंटानं नेस वाडियाविरोधात केलेल्या तक्रारीच्या प्रकरणामध्ये ट्विस्ट आलाय. अंडरवर्ल्ड रवी पुजारीनं धमकी दिल्याची तक्रार नेस वाडिया यांचे वडील नस्ली वाडिया यांनी केलीय. प्रिती झिंटाला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे, अशा स्वरुपाची धमकी रवी पुजारीकडून आल्याचं वाडियांनी तक्रारीत म्हटलंय.
१६ तारखेला दिवसभरात एकूण पाच धमकीचे फ़ोन आले. संध्याकाळी चारच्या सुमाराला नुसली वाडीया यांच्या एका सेक्रेटरीच्या मोबाईलवर फोन आला. यावेळी समोरच्या व्यक्तीनं समोरुन शिव्या दिल्या. अगर प्रिती के मामले में कुछ किया तो, उसके परिणाम भुगतने पडेंगे, प्रिती से दूर रहो. नहीं तो बिझनस में बड़ा नुक़सान झेलना पड़ेगा आणि पुन्हा शिव्या. हा फ़ोन आल्यानंतर बॉम्बे डाईंगच्या ऑफिसमध्ये एकच खळबळ उडाली, नस्ली वाडिया यांच्या सेक्रेटरीनं लगेच नस्ली वाडियांना झाल्या प्रकाराची कल्पना दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.