कतरिना, दीपिका आणि रणबीरचा `सिलसिला`

‘सिलसिला’चा रिमेक बनवण्याची सध्या चर्चा बॉलिवूडमध्ये पसरलीय. यशराज फिल्मस नव्या स्टार कास्टसोबत सिलसिलाचा रिमेक बनवण्याची तयारी करत आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 1, 2012, 04:24 PM IST

www.24taas.com, मुंबई
सिनेसृष्टीत अनेक सिनेमे हिट ठरतात आणि वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या आठवणीत राहतात. १९८१मध्ये ‘ब्लॉकबस्टर’ ठरलेला सिनेमा सिलसिला अजूनही सिनेचाहत्यांना लक्षात आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळाला आहे. या सिनेमातील ‘लव्ह ट्रँगल’ प्रेक्षकांनाही चांगलाच भावला. याच ‘सिलसिला’चा लवकरच रिमेकही पाहायला मिळू शकतो.
‘सिलसिला’चा रिमेक बनवण्याची सध्या चर्चा बॉलिवूडमध्ये पसरलीय. यशराज फिल्मस नव्या स्टार कास्टसोबत सिलसिलाचा रिमेक बनवण्याची तयारी करत आहे. कतरिना, रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण या रिमेकमध्ये एकत्र दिसण्याची चर्चाही रंगतेय. म्हणजे जयाच्या भूमिकेत कॅट, रेखाच्या भूमिकेत दीपिका आणि दोघींबरोबर ऑन स्क्रिन (आणि ऑफ स्क्रीनही) प्रेमाचे धडे रंगवणाऱ्या नायकाच्या भूमिकेत... अर्थातच अमिताभच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसेल.
‘यशराज प्रॉडक्शन’ने हे लक्षात ठेवून या चित्रपटाच्या स्टारकास्टची आखणी केली असावी… कारण खऱ्या आयुष्यात रणबीर हा दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड आणि सध्या कॅट आणि रणबीर या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय, असंच समजलं जातंय. पहिल्या सिलसिला सिनेमाला सिनेचाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं होतं, त्याच्या येणाऱ्या रिमेकला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल ते सिनेमा बॉक्सऑफिसवर कळेलच...