करीना-सैफच्या नात्यातल्या खासगी गोष्टी

बॉलिवूडच्या बेबोने म्हणजेच करीना कपूरने आपली प्रेमप्रकरणं कधीच लपवली नाहीत. मात्र आता सैफ अली खानशी विवाह ठरल्यावर तिने प्रथमच आपल्या नात्याततील खासगी गोष्टी सगळ्यांसमोर मांडल्या.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 1, 2012, 03:53 PM IST

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडच्या बेबोने म्हणजेच करीना कपूरने आपली प्रेमप्रकरणं कधीच लपवली नाहीत. मात्र आता सैफ अली खानशी विवाह ठरल्यावर तिने प्रथमच आपल्या नात्याततील खासगी गोष्टी सगळ्यांसमोर मांडल्या.
करीना म्हणाली, “माझा शाहिदशी ब्रेक-अप झाल्यावर मी टशन फिल्मचं शूट करायला लडाखला गेले. या सिनेमाच्या शूटच्या वेळेस माझ्या सैफशी खूप गप्पा व्हायच्या. सैफ मला खूप हसवायचा. जेव्हा शूटदरम्यान मी सैफला उघडं होऊन सनबाथ घेत असताना पाहिलं, तेव्हा मला सैफ खूप आकर्षक वाटला.”
डेटिंग सुरू झाल्यावर सैफ म्हणाला, की तो आता २५ वर्षांचा राहिलेला नाही. त्यामुळे रोज तोतिला घरी ड्रॉप करत राहू शकत नाही. यानंतर सैफ करीनाची आई बबीता हिला भेटला. आपल्याला करीनाशी लग्न करून आयुष्यभर तिच्यासोबत संसार करायचा असल्याचं तिला सांगितलं. विशेष म्हणजे हे ऐकून बबीताने काहीच हरकत घेतली नाही. करीनाने ताबडतोब आपली बॅग भरून सैफसोबत राहायला निघून गेली.
करीना सैफबद्दल सांगताना म्हणाली, आम्ही गेली ५ वर्षं एकत्र राहातोय. सैफ अजिबात रोमँटिक नाहीये. तो खूप झोपा काढतो. आवरायलाही खूप वेळ लावतो. काही कारणांमुळे आमच्या लग्नाला उशीर होत होता. मात्र अखेर ऑक्टोबरच्या १६ तारखेला आम्ही विवाहबद्ध होत आहोत.