www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या बॉलिवूडमध्ये आयटम साँगची चलती आहे. आयटम साँगचा वारा आणखी कोणाच्यातरी अंगात भिनलायं. भारतीय नृत्यावर थिरकणाऱ्या सोनम कपूरने आपली इच्छा बोलून दाखवताना आयटम साँग करण्याचे म्हटल आहे. आगामी सिनेमा ‘रांझना’मध्ये सोनम भारतीय नृत्यावर थिरकली आहे.
‘मला असं वाटत की आजकालच्या सिनेमांमध्ये पारंपरिक भारतीय नृत्य दाखवले जात नाहीतं. मला माझ्या आगामी सिनेमांमध्ये भारतीय पारंपरिक नृत्य करायचे आहे. काही क्वचितच सिनेमांमध्ये भारतीय नृत्याची झलक पहायला मिळत आहे. भारतीय नृत्याची शेवटची झलक मी `ओम शांती ओम`मध्ये दीपिका पदूकोण आणि `चिकनी चमेली`मध्ये कैतरिनाने केलेल्या नृत्यामध्ये पहायला मिळाली.’ अशी सोनम कपूरने माहिती दिली.
नृत्यातील आपली पार्श्वभूमी सांगताना सोनमने सांगितलं की ती एक प्रशिक्षित नृत्यांगना आहे. सोनम आपल्या आगामी सिनेमा ‘रांझना’मध्ये अभिनेता धनुष आणि अभय देओलसोबत दिसणार आहे. हा सिनेमा २१ जूनला प्रदर्शित होणार आहे.