www.24taas.com, हैदराबाद
टीचर आणि तिचा विद्यार्थी यांच्यातील सेक्सुअल संबंधावर आधारित टॉलिवूडमधील चित्रपट `सॉरी टीचर` अडचणीत सापडला आहे. आंध्र प्रदेशातील शिक्षक संघटनांनी `सॉरी टीचर`वर आक्षेप घेतला आहे.
`सॉरी टीचर` गेल्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. परंतु राज्य मानवाधिकार आयोग आणि हाय कोर्टाने या प्रकरणी दखल घेतल्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले आहे.
`सॉरी टीचर` या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रसिद्ध करण्यात आलेले पोस्टर मात्र इंटरनेटवर धम्माल करत आहेत. नेटिशन्सकडून `सॉरी टीचर`चे फोटोज मोठ्या संख्येने पाहिली जात आहेत.