सलमान-शाहरूख एकाच चित्रपटात झळकणार

बॉलीवूडचा दंबग अभिनेता सलमान खानने काहीही केलं तरी तो सतत चर्चेत असतो. शाहरूख खानच्या चित्रपटात सलमान खान काम करेल?, यावर कुणाचा विश्वास आता तरी बसणार नाही. मात्र शाहरूखचा चित्रपट हॅप्पी न्यू ईअरमध्ये सलमान खान अभिनय करणार आहे.

Updated: Jan 6, 2014, 04:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलीवूडचा दंबग अभिनेता सलमान खानने काहीही केलं तरी तो सतत चर्चेत असतो.
शाहरूख खानच्या चित्रपटात सलमान खान काम करेल?, यावर कुणाचा विश्वास आता तरी बसणार नाही. मात्र शाहरूखचा चित्रपट हॅप्पी न्यू ईअरमध्ये सलमान खान अभिनय करणार आहे.
बॉलीवूडची प्रसिद्धी निर्माता फराह खान शाहरूखला घेऊन, हॅप्पी न्यू ईअर चित्रपट करणार होती, अशी चर्चा होती. फराह खानने २००७ मध्ये शाहरूखला घेऊन ओम शांती ओम नावाचा चित्रपट तयार केला.
एका गाण्यात फराहने बॉलीवूडमधील सर्व बड्या हस्तींना एकत्र आणलं होतं. तसा धमाल प्रयोग आता फराह खान करण्याच्या तयारीत आहे.
या गाण्यात सलमान खानही असावा असा आग्रह फराह खानचा आहे. सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यात २०१३ मध्ये दरी काहीशी कमी झाली आहे. यामुळे याची दाट शक्यता नाकारता येत नाही की, सलमान आणि शाहरूखची जोडी हॅप्पी न्यू ईअर चित्रपटात एकत्र दिसेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.