www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची दुसरी मुलगी आहना देओलच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ म्हणजे सनी आणि बॉबी देओल आले नाही. धर्मेंद्रचे हे दोन्ही मुलं ईशा देओलच्या लग्नातही उपस्थित नव्हते.
आहनाच्या लग्नाला धर्मेंद्र शिवाय त्याचा पुतण्या अभय देओलही आला होता. मात्र सनी आणि बॉबी आपल्या धाकट्या बहिणीच्या लग्नाला न आल्यानं तो चर्चेचा विषय झाला होता.
ड्रीमगर्ल हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची कनिष्ठ कन्य़ा रविवारी विवाहबंधनात अडकली. व्यावसायिक वैभव व्होरा सोबत तिचा विवाह झाला. या लग्नाला बॉलिवूडसह राजकीय आणि बिझनेस क्षेत्रातील अनेक आयकॉन उपस्थित होते. महानायक अमिताभ बच्चन तर आपल्या संपूर्ण कुटुंबासह लग्नाला उपस्थित होते. धर्मेंद्र हेमा मालिनीसह येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत होते. आहना आणि वैभवचा गेल्या वर्षी जून महिन्यात साखरपूडा झाला होता. त्यावेळीही सनी आणि बॉबी या समारंभापासून दूर होते. यापूर्वी २०१२मध्ये ईशा देओलच्या लग्नालातही दोघं अनुपस्थित होते.
मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या या शाही विवाह सोहळ्यात शाहरुख खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शबाना आझमी, जितेंद्र आणि सोनाक्षी सिन्हा सारखे बॉलिवूडचे दिग्गज उपस्थित होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.