बॉलिवूडमध्ये बऱ्याच लोकांचं प्रेम मिळतयं- सनी

पॉर्न स्टार सनी लिऑन जरा भलतीच खूश झालेली आहे. बॉलिवूडमध्ये तिने आपले जलवे दाखविल्यानंतर तिला अनेक ऑफर येऊ लागल्या.

Updated: May 8, 2013, 04:05 PM IST

www.24taas.com, मुंबई
पॉर्न स्टार सनी लिऑन जरा भलतीच खूश झालेली आहे. बॉलिवूडमध्ये तिने आपले जलवे दाखविल्यानंतर तिला अनेक ऑफर येऊ लागल्या. आणि त्यामुळेच बॉलिवूडमध्ये आल्याने ती बरीच खूश असल्याचे तिने सांगितले आहे. रियालिटी शोमधून सनीने बॉलिवूडच्या आपल्या करिअरला सुरवात केली.
सुरवातीला पूजा भट्टच्या जिस्म-२ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता ती एकता कपूरच्या रागिनी एमएमएस २ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. तर दुसरीकडे शूटआऊट अट वडाळा या सिनेमात तिने एक आयटम साँगही केले आहे. या आयटम नंबरमध्ये तिने तिच्या अदांनी साऱ्यांनाच घायाळ केलं आहे.

फोटोफीचर सनी लिऑनचा हटके लूक...

सनी लिऑन म्हणते की, बॉलिवूडमध्ये काम करण्याचं माझं स्वप्न अखेर पूर्ण झाल्यासारखं आहे. आतापर्यंतचा माझा हा प्रवास अत्यंत सुखद आणि अपेक्षेपेक्षा जास्त चांगला राहिला आहे. या ठिकाणी मी अगदीच नवखी आहे. मला अनेक चांगल्या ऑफर येत आहेत. मी त्यामुळे मी खूप खूश आहे. लोक मला स्विकारत आहेत याचा आनंद होतोय. ऐवढ्या लोकांचं मला प्रेम मिळतं आहे. ‘लैला’ या आयटम साँगला मिळालेलं यश यामुळे सनी चांगलीच उत्साहात होती.