सन्नी लियॉनीचे नवे गाणे 'बेबी डॉल' रिटर्न्स

रागिनी एमएमएस-२ या चित्रपटांतील प्रसिद्ध झालेल 'बेबी डॉल' हे गाणे, खूपच लोकप्रिय झाले होते. हेच गाणे पुन्हा एकदा सन्नी लियॉनीच्या येणाऱ्या पुढील मस्तीजादे या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Updated: Nov 28, 2015, 01:07 PM IST
सन्नी लियॉनीचे नवे गाणे 'बेबी डॉल' रिटर्न्स title=

मुंबई : रागिनी एमएमएस-२ या चित्रपटांतील प्रसिद्ध झालेल 'बेबी डॉल' हे गाणे, खूपच लोकप्रिय झाले होते. हे गाणं पुन्हा एकदा सन्नी लिओनच्या  आगामी 'मस्तीजादे' या चित्रपटातही दिसणार आहे.

निर्माते मिलाप झावेरी यांच्या आगामी 'मस्तीजादे' या चित्रपटासाठी रागिनी एमएमएस-२ मधील अतिशय लोकप्रिय झालेले 'बेबी डॉल' हे गाणे त्यांनी टी-सीरीज कडून विकत घेतल्याचं समजतंय. 'बेबी डॉल' हे गाण मीत ब्रदर्स यांनी बनवले होतं.

'मस्तीजादे' हा निर्माते मिलाप झावेरी यांच्या येणारा पुढील चित्रपट आहे. या  चित्रपटात अभिनेत्री सन्नी लिओन आणि अभिनेता तुषार कपूर दिसतील. हा चित्रपट एक अडल्ट कॉमेडी असेल.   

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.