अर्जुननं सलमानला चक्क रडवलं!

सलमान खान नेहमीच नवीन कलाकरांना उपदेशाचे डोस देताना दिसतो. यावेळी त्याचा शिष्य बनलाय बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर. पण त्याच्यातील सच्चा कलाकार बघून सलमानच्या डोळ्यात चक्क आश्रू आलेत.

Updated: Apr 10, 2013, 09:28 AM IST

www.24taas.com, मुंबई
नवीन कलाकारांना अनेकदा सलमान खानकडून उपदेशाचे डोस मिळत असतात. त्याच्या शिष्यांत आता बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूरचाही समावेश झालाय. सलमानला गुरुच्या स्थानी मानणाऱ्या याच अर्जुननं सलमानला चक्क रडायला भाग पाडलंय.
‘यशराज’ बॅनरच्या ‘इशकजादें’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारा अर्जुन कपूर लवकरच ‘औरंगजेब’ या थ्रीलरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचं ट्रेलर नुकतच लॉन्च झालंय. त्यानिमित्ताने अर्जुननं सलामानला ट्रेलर दाखवण्यासाठी घरी आमंत्रण दिलं होतं.
औरंगजेब सिनेमाचा ट्रेलर बघुन सलमान थक्कच झाला. एव्हढचं नाही तर, अर्जुनची मेहनत आणि त्याच्या आतला सच्चा कलाकार बघून सलमानच्या डोळ्यात चक्क अश्रू तरळले.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘सलमानला ते ट्रेलर खूप आवडलं. ते ट्रेलर बघून सलमानला आपल्या आसवांना आवर घालता आला नाही आणि सलमानच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळाघळा वाहू लागले.’