कुठे गेली पूनम पांडे? पोलीस घेतायेत शोध!

नेहमीच वादात अडकणारी मॉडेल पूनम पांडे सध्या बेपत्ता आहे. पूनम पांडे अचानक गेली कुठे याचा शोध मुंबई आणि बंगळुरूचे पोलीस घेत आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 15, 2013, 05:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नेहमीच वादात अडकणारी मॉडेल पूनम पांडे सध्या बेपत्ता आहे. पूनम पांडे अचानक गेली कुठे याचा शोध मुंबई आणि बंगळुरूचे पोलीस घेत आहेत.
पूनम पांडे नेहमीच वादात असते. कधी न्यूड होण्याच्या तिच्या वक्तव्यावरुन तर कधी तिच्या फोटोंमुळे... २०१२मध्ये पूनम पांडेनं भगवान विष्णूच्या चित्रासोबत आपले अर्धनग्न फोटो काढले होते. त्यामुळं धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी पूनम विरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. याच एस. उमेश यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बंगळुरू कोर्टात तिला ३१ ऑक्टोबरला सुनावणीसाठी हजर राहायचंय.
त्याबाबतचीच नोटीस पूनम पांडेला पाठविली आहे, पण ती पोलिसांना भेटू शकली नाही. पोलिसांनी सांगितलं की, पूनम पांडे ही बेपत्ता असल्यामुळं तिला समन्स देऊ शकलो नाहीत. त्यामुळंच आता पोलीस तिचा शोध घेत आहेत.
दरम्यान, बिग बॉसच्या सिझन ७ साठी २ कोटी रुपये मागितल्यानंतर पूनम पांडे चर्चेत आली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.