आपल्या ‘शॉर्ट ड्रेस’मुळे कतरीना पुन्हा एकदा खजिल!

आमिर खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला `धूम ३` या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघंही सध्या खूप व्यस्त आहेत. नुकतंच चित्रपटाचं ‘टायटल म्युझिक ट्रॅक’चं लॉन्चिंग पार पडलं. यावेळी, कतरीनाची तिनं परिधान केलेल्या फ्रॉकनं चांगलीच फजिती केली.

Updated: Dec 11, 2013, 08:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आमिर खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला `धूम ३` या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघंही सध्या खूप व्यस्त आहेत. नुकतंच चित्रपटाचं ‘टायटल म्युझिक ट्रॅक’चं लॉन्चिंग पार पडलं. यावेळी, कतरीनाची तिनं परिधान केलेल्या फ्रॉकनं चांगलीच फजिती केली.
‘धूम ३’ला चांगली प्रसिद्ध मिळावी म्हणून आमिर आणि कतरीना रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. नुकत्याच एका प्रमोशन कार्यक्रमादरम्यान कतरीना कैफला ‘वॉर्डरोब मालफंक्शन’ला सामोरं जावं लागलं.
त्याचं झालं असं की, या कार्यक्रमासाठी कतरीनानं शॉर्ट गुलाबी फ्रॉक घातला होता. त्यावर क्रॉस मॅचिंग असे काळ्या रंगाचे आणि उंच टाचांचे सँडल शोभून दिसत होते. या कार्यक्रमात तिला एका उंच स्टुलावर बसण्यास सांगितलं गेलं... त्या स्टुलावर बसताना हवेच्या झोतानं कतरीनाचा छोटा फ्रॉक आणखीनच वर उडाला. त्यामुळे कतरीना चांगलीच खजिल झाली.
कतरिनाबरोबर हा प्रसंग पहिल्यांदाच घडलाय अशातली गोष्ट नाही. कारण, याआधीही ‘जब तक है जान`च्या प्रमोशनाच्या वेळी असाच किस्सा घडला होता. छोटा क्रिम कलरच्या ड्रेसनं तिची अशीच फजिती केली होती... त्यानंतर `एक था टाइगर`च्या वेळीही कतरीनाबरोबर हाच प्रसंग ओढावला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट स्कर्टवर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.