www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताचा महान बॅटसमन आपल्या टेस्ट करिअरच्या २०० वी टेस्ट लवकरच खेळणार आहे. पण, हीच मॅच त्याची शेवटची टेस्ट असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
नोव्हेंबर महिन्यात दोन टेस्ट मॅचची सीरिज भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान होणार आहे. दुसरी टेस्ट मुंबईतच असेल आणि हीच मॅच सचिनची २००वी टेस्ट असेल. २०० मॅच पूर्ण केल्यानंतर सचिन टेस्ट क्रिकेटमधूनही निवृत्ती स्वीकारू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि सिलेक्टर्सनंही याचे संकेत दिलेत. निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही यासंदर्भात सचिनची भेट घेतलीय. २०० टेस्ट पूर्ण केल्यानंतर सचिनच्या खेळण्याबद्दल बोर्ड निवड समिती सचिनच्या भविष्याबद्दल निर्णय घेऊ शकतात, असं त्यानं सचिनला स्पष्ट सांगितल्याचंही समजतंय.
सचिननं आपल्या करिअरमधल्या १९८ टेस्ट मॅच आत्तापर्यंत खेळल्यात. २०० मॅचसाठी आता फक्त दोन मॅच उरल्यात. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना याही पूर्ण होतील. म्हणजेच सचिन आपल्या करिअरमधली २००वी मॅच भारतातच खेळणार हे आता स्पष्ट झालंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.